पुनश्च महाबळेश्वर
या वर्षी आमची पावसाळी महाबळेश्वर वारी गणपतीत घडली. हो, आम्ही वर्षात दोनदा तरी महाबळेश्वरी जातो. पावसाळ्यात आणि स्ट्रॉबेरी च्या हंगामात. तर या वेळी गणपतीच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी आम्ही तिथे होतो. मार्केट रोडवरुन विसर्जनाच्या मिरवणुकी चालल्या होत्या. त्यांचा तो लक्ष्मी रोड आहे ना! मळ मजा वाटली, महाबळेश्वरात गणपती बसत असतील, विसर्जनाच्या मिरवणुकी असतील असं कधी डोक्यातच आलं नाही!
थंडीतलं महाबळेश्वर कसं खास ‘लोकाग्रहास्तव’ असतं. पाहुण्यांसमोर शहाण्यासारख्या वागणा-या मुलासारखं. उन्हाळ्यात ते भडक गुज्जु असतं वेण्णा लेकवर नवीन उपटलेल्या चौपाटीसारखं. पावसाळ्यात मात्र ते फक्त स्वत:चं असतं. सगळ्या स्थिर, चर, वस्तुमात्रांवर हिरव्याचं आक्रमण झालेलं असतं. दगड, रस्ते, झाडे, भिंती, छपरं, माणसं, सगळं दमट आणि हिरवं.
पावसाळ्यातल्या महाबळेश्वरला एक स्वभाव आहे. गुढ भासतं ते या काळात. सगळ्या आसमंताला गुरफटुन टाकणारी ढगाची घोंगडी, लहरी पाउस, शेवाळाच्या झिप-या पिंजारलेली निष्पर्ण झाडं. महाबळेश्वर मोठं ‘ऍटमॉस्फेरीक’ असतं. ग्रेसच्या कवितेसारखं रहस्यमय, आकर्षित करणारं, स्वयंमग्न आणि लिरिकल!

October 28, 2006 at 11:07 am
Lekh, photos aaNi vegavegaLyaa mosamateel mahaabaLeshwaralaa dilelyaa upamaa aavaDalyaa.
October 30, 2006 at 9:57 am
dhanyavaad, Nandan!
January 31, 2007 at 6:32 pm
My name is Pradeep ranade & My native place was Harnai Murud ( close to wyagreshwar) It was nice to see some photos of Konkan area.
September 5, 2007 at 10:11 am
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
February 5, 2009 at 6:41 am
Chhan lihilay… photos tar apratim ahet…. Mahabaleshwarla dilelya upma awadlya… nice to read…
June 23, 2009 at 5:09 pm
As per U, we also plan to visit in this rainny season. We expect rush in this season might be lesser.